Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी मिस्टर इंडियाचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन !

माजी मिस्टर इंडियाचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन !


नवी दिल्ली:  देशातील प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि माजी मिस्टर इंडिया प्रेमराज अरोरा यांचे निधन झाले आहे. प्रेमराज यांचे वय अवघे 42 वर्षे होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच फिटनेस क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे. प्रेमराज हे फिटनेस क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव होत. हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.

42 वर्षीय माजी मिस्टर इंडिया प्रेमराज अरोरा यांचा मृतदेह त्यांच्या वॉशरूममध्ये आढळून आला. वर्कआऊट करून तो वॉशरूममध्ये गेल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. “त्यांनी कोणत्याही प्रकारची औषधे घेतलेली नाहीत, निरोगी आहाराचे पालन केले आणि ते फिटनेस कोचसह जिम इन्स्ट्रक्टर म्हणून देखील काम करायचे अशी माहिती प्रेमराज यांच्या कुटुंबीयांनी दिली.

प्रेमराज अरोरा हे त्याच्या बॉडी बिल्डिंगसाठी खूप प्रसिद्ध होते. 2014 मध्ये त्यांनी मिस्टर इंडियाचा किताब जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या पश्चात कुटुंबात त्यांच्या दोन मुली आणि पत्नी आहे. प्रेमराज अरोरा यांच्या निधनाची बातमी येताच फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग क्षेत्रातून हालहाल व्यक्त कंजेली जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी प्रेमराज यांना श्रद्धांजली अर्पण केल्याचे देखील पाहायला मिळाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.