Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जांभळाचा मोह जीवावर बेतला 30 वर्षीय तरूणाचा मृत्यू


जांभळाचा मोह जीवावर बेतला 30 वर्षीय तरूणाचा मृत्यू  



राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर मांगोली मार्गावरील ओढ्याजवळ असणाऱ्या जांभळाच्या झाडावरून पडून सुरज भाऊसो पाटील ( वय ३०, रा.इंग्रुळ ता.बत्तीसशिराळा जि.सांगली ) यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (दि. १) दुपारी तीन ते चारच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आज दुपारी सूरज पाटील बत्तीसशिराळा सांगली येथून चारचाकी ( १०सीए ७२४४) गाडीने राधानगरी तालुक्यातील मांगोली येथील प्रवाशी भाडे घेऊन आले होते. प्रवाशांना सोडून परत जाताना मांगोली कपिलेश्वर रस्त्यावरील ओढ्याजवळ त्यांना जांभळाचे झाड दिसले. जांभळे तोडण्यासाठी ते झाडावर चढले होते. मात्र जांभळाचा मोह त्यांच्या जीवावर बेतला. झाडाची फांदी तूटून ते ओढ्याच्या आरसीसी कठड्यावर पडल्याने गंभीर दुखापत होऊन ते पाण्यात पडल्याने त्यांचा जागीच मॄत्यु झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड, पोलिस कृष्णात यादव,प्रवीण गुरव, पोलीस पाटील वसुधा पाटील,मानसिंग काटकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोळांकुर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.रात्री उशिरा नातेवाईक आले. त्यानंतर म्रुतदेह ताब्यात घेतला. नातेवाईकांचा आक्रोश जीव पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या मागे पत्नी, आईवडील असा परिवार आहे.

सुरज पाटील यांचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले आहे. त्यांचे किराणामालाचे दुकान असून प्रवासी भाड्याने गाडीही चालवत होते..त्यांच्या अपघाती म्रुत्युमुळे नातेवाईकांनी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात केलेला आक्रोश ह्रदय पिळवटणारा होता..घटनास्थळी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.