224 आमदाराच्या विधानसभेसाठीपोचल्या या 10 आमदार
कर्नाटक विधानसभेत २२४ जागंपैकी दहा जागांचे प्रतिनिधित्व महिला आमदार करणार आहेत. यात बेळगाव जिल्ह्यातील दोन महिला आमदारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या उमेदवारीवर चार महिला निवडून आले असून भाजप तीन, धजद दोन तर एक अपक्ष महिला उमेदवाराचा त्यात समावेश आहे.
बेळगाव ग्रामीणच्या काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर या दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. महिला उमेदवारांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा मान देखील त्यांना मिळाला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार नागेश मनोळकर यांचा तब्बल ५६,०१६ इतक्या प्रचंड मताधिक्याने पराभव केला आहे. निपाणी मतदारसंघातून भाजप उमेदवार शशिकला जोल्ले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांचा ७, ४०१ मताधिक्याने पराभव केला असून त्या देखील दुसऱ्यांदा विधानसभेवर विजयी झाल्या आहेत. देवदुर्ग मतदारसंघात आमदार तसेच भाजपचे उमेदवार शिवणगौडा नायक यांचा धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या उमेदवार करेम्मा यांनी ३४,२५६ मताधिक्याने पराभव केला आहे
गुलबर्गा उत्तर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार कनिज फातिमा दुसऱ्यांदा विजयी ठरले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा पराभव केला. दिवंगत मंत्री कमर ऊल इस्लाम यांच्या त्या पत्नी आहेत. हरप्पनहळ्ळी मतदारसंघात देखील यंदा धक्कादायक निकाल पाहावयास मिळाला. दोन वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री जी. करुणाकर रेड्डी यांचा अपक्ष महिला उमेदवार लता मल्लिकार्जुन यांनी १३,८४५ मताधिक्याने पराभव केला आहे. जयनगर मतदार संघात काँग्रेस उमेदवार सौम्या रेड्डी दुसऱ्यांदा विजयी ठरल्या आहेत. या ठिकाणी त्यांना निसटता विजय मिळाला असून भाजप उमेदवार सी. के. राममूर्ती यांना केवळ २९४ मतानी पराभव स्वीकारावा लागलाकोल्हार गोल्डफिल्ड मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवार रूपकला एम. दुसऱ्यांदा विजयी ठरल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने महादेवपुरा मतदारसंघातून यंदा तीन वेळचे आमदार अरविंद लिंबावळी यांना तिकीट नाकारत त्यांच्या पत्नी मंजुळा यांना उमेदवारी दिली होती. मंजुळा यांचाही विजय झाला आहे. शिमोगा ग्रामीण मतदारसंघात आमदार तसेच भाजप उमेदवार के. बी. अशोक नाईक यांचा धजदच्या शारदा नाईक यांनी पराभव केला आहे. सन २०१३ मध्येही त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. यंदा पुन्हा एकदा जनतेने शारदा यांना कौल दिला आहे.
मुरुळ्य या महिला उमेदवाराला संधी दिली होती. त्यांनी विजय मिळवला आहे. १९९४ पासून सहा वेळा एस. अंगारा यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. यंदा भाजपने त्यांना तिकीट नाकारत भागीरथी यांना उमेदवारी दिली होती. ग्रामपंचायत ते जिल्हा पंचायत सदस्य असा प्रवास केलेल्या भागीरथी यांना आता विधानसभा प्रवेश करता आला आहे. यात बेळगाव जिल्ह्यातील दोन महिला आमदारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या उमेदवारीवर चार महिला निवडून आले असून भाजप तीन, धजद दोन तर एक अपक्ष महिला उमेदवाराचा त्यात समावेश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.