अधिकाऱ्याचा घरात सापडली 20 कोटींची कॅश; बॅगेत पैसेच पैसे
सीबीआयने जल शक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत वॉटर अँड पॉवर कन्सल्टसी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडचे (WAPCOS) माजी सीएमडी राजेंद्र गुप्ता याच्या घरातून तब्बल 20 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
सीबीआयने पुन्हा एकदा एका मोठ्या अधिकाऱ्यावर छापा टाकून कोट्यवधीची रक्कम हस्तगत केली आहे. राजेंद्र गुप्ता याच्या घरात एवढी मोठी रक्कम कुठून आली? कुणाची आहे? याची माहिती सीबीआय गोळा करत आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहेवॉटर अँड पॉवर कन्सल्टसी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड WAPCOS हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. हे जल शक्ति मंत्रालयाच्या अंतर्गत येते. सीबीआयने राजेंद्र गुप्ता यांच्याविरोधात तक्रार आली होती. त्यांच्या कुटुंबीयांच्या सदस्यांकडे अनेक ठिकाणी जमीन आणि मालमत्ता आहे. तसंच त्यांच्या घरात रोख रक्कम असल्याची माहिती मिळाली
सीबीआयाने राजेंद्र गुप्ता यांच्या घरावर आणि कमर्शियल प्रापर्टीज जी, दिल्ली, चंदीगड, पंचकुला, गुरुग्राम, सोनीपत आणि गाजियाबाद सह 19 ठिकाणी आहे. या कारवाईमध्ये राजेंद्र गुप्ता याच्याकडे 20 कोटींची रोख रक्कम आणि कागदपत्र सापडली आहे. एवढी मालमत्ता कुठून आली याचा तपास सीबीआय करत आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.