Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मजुराच्या खात्यात होते फक्त 17 रुपये, बँक बॅलन्स चेक केला तेव्हा दिसले तब्बल 100 कोटी

मजुराच्या खात्यात होते फक्त 17 रुपये, बँक बॅलन्स चेक केला तेव्हा दिसले तब्बल 100 कोटी


कोलकाता : चुकून दुसऱ्याला पैसे ट्रान्सफर झाल्याची अनेक उदाहरणे आत्तापर्यंत समोर आली आहेत. त्यात आता पश्चिम बंगालमधील  रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराच्या खात्यात एक-दोन नव्हे तर तब्बल 100 कोटी रुपये जमा झाले. ही माहिती जेव्हा त्या मजुराला कळाली तेव्हा त्यालाही धक्काच बसला. कारण त्याच्या अकाउंटमध्ये फक्त 17 रुपये होते. पण जेव्हा त्याने बॅलन्स चेक केला तेव्हा त्याला हे समजले.

मोहम्मद नसिरुल्ला मंडल असे या व्यक्तीचे नाव आहे. तो मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बासुदेबपूर गावचा रहिवासी आहे. त्याच्या अकाउंटमध्ये अवघे 17 रुपये होते. पण जेव्हा त्याला सायबर सेल विभागाकडून नोटीस मिळाली. तेव्हा त्याला याची माहिती मिळाली. देगाना सायबर सेलने मोहम्मद नसिरुल्ला मंडल याला 30 मे रोजी फोन करून त्याच्या बँक खात्यात अचानक आलेल्या पैशांची चौकशी केली. पण त्यालाच हे पैसे कधी आणि कुठून आले हे समजले नव्हते. त्यामुळे तो अवाक् झाला. त्यात पोलिसांचा फोन आल्यानंतर त्याची झोपच उडाल्याचे त्याने सांगितले.

बँकेत गेलो अन्.

माझ्या बँक अकाउंटमध्ये 100 कोटी रुपये होते. सुरुवातीला माझा विश्वासच बसला नाही. मी पुन्हा पुन्हा अकाउंट बॅलन्स चेक केला. पण त्यावेळी माझ्या अकाउंटमध्ये 100 कोटी रुपये होते. याची अधिक चौकशी करण्यासाठी बँकेत गेलो तेव्हा माझ्याखात्यात 17 रुपये असल्याचे समजले. म्हणजे जेवढे पैसे आले होते ते सर्व परत गेले, असे त्याने सांगितले.

माझे कुटुंबीय घाबरलेत

दरम्यान, जेव्हा मी माझा अकाउंट बॅलन्स Google Pay वर चेक केला तेव्हा अॅपमध्ये मला सात अंकी रक्कम दिसली. हे पैसे माझ्या खात्यात कसे आले, मी सांगू शकत नाही. याची मला काहीच माहिती नाही. मी रोजंदारीवर काम करतो. मला पोलिसांकडून कारवाई होण्याची किंवा मारहाण होण्याची भीती वाटते. माझे कुटुंबीयही घाबरले आहेत, असे मंडल याने म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.