लिफ्ट मध्ये अडकून 14 वर्षाच्या मुलाचे शीर धडावेगळे
छत्रपती संभाजीनगर कटकट गेट परिसरात दुर्दैवी घटना समोर आली असून, हॉस्पिटलच्या परिसरात राहत असलेल्या 14 वर्षीय मुलाचे लिफ्टमध्ये डोके अडकून मृत्यू झाला आहे. नववीत शिकणाऱ्या या मुलाचे आई वडील हैदराबादला गेल्याने तो घरी एकटाच होता. घरी तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना त्याने लिफ्टबाहेर डोके काढले. लगेचच लिफ्ट सुरू होताच त्याचे शीर शरीरापासून वेगळे झाले. या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. साकिब इरफान सिद्दीकी (वय 14 वर्षे) असं मृत मुलाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, साकिब एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी आहेत. साकिबचे वडील इरफान हे टूर्स अँड ट्रॅव्हल्स कार्यालयात काम करतात. त्यांचे मुख्य कार्यालय हैदराबाद येथे आहे. कामानिमित्त त्याचे आई-वडील हैदराबादला गेले आहेत. साकिब हा आजी- आजोबाकड ठेवलेला होता. रात्री तो लिफ्टमध्ये खेळत होता. त्याने खेळता-खेळता लिफ्ट सुरू केली आणि मुंडके बाहेर काढले. तोच, त्याचे मुंडके धडावेगळे झाले. त्यानंतर तेथे एकच धावपळ उडाली. त्याला मदत करण्याचीही संधी कोणाला मिळाली नाही. दरम्यान, रात्री उशिराला जिन्सी पोलिसांना ही माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविला.
घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
इरफान सिद्दीकी हे ट्रॅव्हल्स कार्यालयात काम करतात आणि त्यांना साकिब एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे साकिब घरात सर्वांचाच लाडका होता. तसेच आई-वडील बाहेर गेल्यास तो आजी-आजोबांकडे राहत असल्याने, इरफान आणि त्यांच्या पत्नी त्याला सोडून हैदराबादला गेले होते. मात्र लिफ्टमध्ये अडकून साकिबचं दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्याच्या आई-वडिलांना धक्का बसला. तर सिद्दीकी कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. तर या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
काळजी घेण्याची गरज...
अनेकदा लहान मुलं रडत असल्यास लिफ्टमधील गाणे लावणे, मुलांना लिफ्टमधून खालीवर नेणे असे प्रकार आईवडिलांकडून केले जातात. त्यामुळे मुलांना द्खील लिफ्टची सवय लागती. तर अनकेदा आई-वडील नसताना देखील मुलं लिफ्टसोबत खेळतात. तर अशाप्रकारे दुर्दैवी घटना घडल्यास त्यातून स्वतःला वाचवणे देखील मुलांना शक्य होत नाही. त्यामुळे लिफ्टचा वापर लहान मुलांच्या खेळण्यासाठी करणे टाळले पाहिजे. तसेच लिफ्ट वापरताना मुलांची काळजी घेतली पाहिजे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.