11 ते 13 मेच्या दरम्यान फडणवीस यांना मोठा धक्का बसेल; सुषमा अंधारे
11 ते 13 मे दरम्यान फडणवीस यांना धक्का बसेल अशा घटना घडणार; सुषमा अंधारे यांचा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकात एका रॅलीला संबोधित केलं होतं. मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतच असतो. कसा येतो हे तुम्हाला माहीत आहे, असं विधान फडणवीस यांनी केलं होतं.
या विधानावरून सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांची फिरकी घेतली. फडणवीस पुन्हा येईन म्हटले होते. ते आले. एकदा विरोधी पक्षनेते म्हणून आणि दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून आले. फडणवीस यांच्या विरोधात दिल्लीश्वरांचा गट इथे सक्रिय आहे. त्यामुळे फडणवीस पुढील काळात येतील पण विरोधी पक्षांचे नेते म्हणून, असा चिमटा सुषमा अंधारे यांनी काढला.
राणेंना गांभीर्याने कसं घ्यायचं?
यावेळी त्यांनी भाजप नेते नितेश राणे यांना फटकारलं. नितेश राणेंविषयी काहीही बोलावसं वाटत नाही. राणेंना गांभीर्यानं कसं घ्यायचं? त्यांना बारसूत हिंग लावूनही लोकांनी विचारलं नाही, असा खोचक टोला अंधारे यांनी लगावला.
कोकण शिवसेनेचाच गड
रायगड, कोकण हा शिवसेनेचा गड आहे. रायगडने ठाकरे आणि शिवसेनेला भरभरून दिलं आहे. बऱ्याचशा समीकरणाची उकल होणार आहे. स्नेहल जगतापच्या पाठीशी उद्धव ठाकरेंची ताकद उभी आहे. कुणाला दाखवायची म्हणून आमची सभा नाही. बारसू आंदोलकांसाठीची ही सभा आहे, असं त्या म्हणाल्या.
अमराठींच्या जमिनी
बारसूत गुप्ता नावाच्या अधिकाऱ्याकडे 92 एकर जमीनी आहेत. बारसूत आशिष देशमुखांची 18 एकर जमीन आहे. बारसूतील सगळी नाव अमराठी आहेत. कोकणवासियांना हुसकावून लावण्याचा चंग बांधला आहे. या भूमिकेतून बारसू प्रकल्पग्रस्तांना भेटण्यासाठी गेले. आम्ही तुमच्या लढाईत सोबत असल्याचं सांगितलं
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.