1 मे ला कामगार दिवस का म्हणतात?
सतराव्या शतकाच्या मध्यात सुरु झालेल्या औद्योदिक क्रांतीने युरोपमध्ये एक नवी युगाती सुरुवात केली होती. मात्र या नवीन युगाबरोबरच नव्या समस्याही उदयास आल्या. त्यातील एक समस्या होती कामगरांची. युरोपात औद्योगिक क्रांतीला सुरुवात तर झाली मात्र कामगार वर्गाचे शोषण वाढीस लागले. त्यावेळी कामाचे तास हे आठ दहा नव्हते. तर कामगारांना तब्बल १५ तास काम करावे लागे. त्यातल्या त्यात जनावरासारखं काम करून मोबदलाही मिळत नव्हता. मात्र मजुरांनी याविरोधात आंदोलन पुकारलं. कामगारांच्या या पाऊलाने जगाच्या पाठीवर कामगारांचा नवा इतिहास कोरला गेला.
आजच्या दिवशी अमेरिकेत कामगारांनी ७ तासांचे काम असावे अशी मागणी केली होती. ऑस्ट्रेलियात ही चळवळ पुढे आठ तासांचा दिवस म्हणून ओळखली जाऊ लागली. २१ एप्रिल हा दिवस तेव्हापासूव ऑस्ट्रेलियात कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.मात्र १ मे रोजी ऑस्ट्रेलियात थरारक घटना घडली. युनायटेड स्ट्रेट्समधील कामगारांनी आठ तास कमा करण्याचे आवाहन पुकारले. मागण्यांसाठी संप आणि मोर्चे निघाले.मात्र त्यावेळी झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी ट्रकने हुसकावून लावले. या घटनेने कामगारांतील संताप आणखी वाढला. प्रतिउत्तर म्हणून पोलिसांवर बॉम्बस्फोट करण्यात आले. यात ७ पोलिस आणि ४ नागरिकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आठ जणांना अटक होऊ फाशीची शिक्षा सुणावण्यात आली. या घटनेने जगभर संताप व्यक्त झाला. कारण या ८ जणांपैकी कोणीही बॉम्ब फेकले नसल्याचे सांगण्यात येत होते.
अशा प्रकारे या रक्तरंजित आंदोलनानंतर 1 मे 1980 रोजी कामगार चळवळ यशस्वी झाली. न्याय्य वेतन, चांगली वागणूक, पगारी रजा आणि ८ तास काम या मागण्या मान्य करण्यात आल्या. तेव्हापासून हा दिवस अमेरिकेत कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.
1904 मध्ये अॅमस्टरडॅम येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय संघ परिषदेने जगभरातील कामगार संघटनांना 1 मे हा दिवस 8 तासांचा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन केले. भारतीय मजदूर किसान पक्षाने 1 मे 1923 रोजी सर्वप्रथम कामगार दिन साजरा केला. त्याच वेळी, भारतात प्रथमच, कामगार दिनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लाल ध्वज वापरण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.