Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुम्ही ज्यांच्यासाठी नथीतून तीर मारताय ते अब्जाधीश; सुषमा अंधारे

तुम्ही ज्यांच्यासाठी नथीतून तीर मारताय ते अब्जाधीश; सुषमा अंधारे 



मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका केली होती. जोडे पुसण्याची पात्रता असणारे व्यक्ती सरकारमध्ये असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. रिफायनरीच्या मुद्यावरून आंदोलकांवर होत असलेल्या दडपशाहीच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली होती. या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं.

काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

एकनाथ शिंदेंच्या या टीकेवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला. कष्टकऱ्यांच्या कष्टाबद्दल आम्हाला अपार आदर आहे. मी स्वतः खडतर संघर्षातून उभी राहतेय. आपण उल्लेख केलेली कष्टाची कामे सध्या मंत्रिमंडळातील कोणता मंत्री करत आहे बरं? कारण तुम्ही ज्यांच्यासाठी नथीतून तीर मारताय ते आता अब्जाधीश आहेत. कृपया नोंद घ्यावी, असं सुषमा अंधारे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे...असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.