Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतातील बौद्ध स्थळांच्या संवर्धनाचे काम निखिल बनसोडे यांनी जागतिक पातळीवर पोहोचवले. उद्योगपती सी.आर.सांगलीकर

भारतातील बौद्ध स्थळांच्या संवर्धनाचे काम निखिल बनसोडे यांनी जागतिक पातळीवर पोहोचवले. उद्योगपती सी.आर.सांगलीकर 


आधुनिक भारतातील बौध्द स्थळांच्या संवर्धनाचे काम निखिल बनसोडे यांनी जागतिक पातळीवर पोहचवले - ॲड. सी आर सांगलीकर

सांगली : बौद्ध विचारांचा भारतीय वारसा व आधुनिक भारतात बौध्द स्थळांना व प्रतिकांना मिळालेले उच्च स्थान जागतिक  पातळीवर पोहचवण्याचे काम निखिल बनसोडे यांनी केले आहे. प्राचीन बौध्द वारसा स्थळांचे संवर्धन व जतन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द उद्योजक ॲड. सी. आर. सांगलीकर यांनी केले.
    
कवठेमहांकाळ येथील निखिल बनसोडे यांनी मलेशिया येथील जागतिक बौध्द परिषदेमध्ये आपला शोधनिबंध सादर केला होता. निखिल बनसोडे यांचा सी आर सांगलीकर ग्रुप व दिपस्तंभ सांस्कृतिक संघ यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
      
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा बुद्धांचा विचार समाजातील प्रत्येक स्तरावरती प्रसारित केला पाहिजे आणि हेच काम निखिल संजय बनसोडे यांनी मलेशियामध्ये  जागतिक बौद्ध विचारवंतांच्या परिषदेमध्ये संशोधनाच्या माध्यमातून मांडले. उच्चशिक्षित तरूणांनी निखिल बनसोडे यांची पेरणा घ्यावी, ॲड. सी.आर सांगलीकर म्हणाले.       
    
भारतामध्ये अशा अनेक ठिकाणी बौद्ध कार्यांच्या विचारांच्या सांस्कृतिक खुणा दिसून येतात त्याचे संशोधन करण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या अभ्यासामध्ये अनेक घटना जागतिक पातळीवरती यापुढेहा मांडण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही निखिल बनसोडे यांनी सत्काराला उत्तर देताना दिली. निखिल बनसोडे यांची अभ्यासाची वृत्ती, संशोधक गुण, समाजाप्रती असणारी तळमळ,  बुद्ध विचारांशी असणारी जवळीक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारी सामाजिक चळवळ हे गुण दिसून येतात, असे प्रतिपादन प्रा. बाळासाहेब कर्पे यांनी केले.            
    
यावेळी सुरेश माने, भारत शिंदे, संजय होवाळे, सुर्यकांत कटकोळ, सचिन इनामदार, प्रदीप कांबळे, महेश शिवशरण, अविनाश जाधव, चंद्रकांत चौधरी, सुनील पाटील, विश्वस मागाडे, संजय बनसोडे, इंजि. अक्षय बनसोडे हे  उपस्थित होते.

(फोटोओळी - निखिल बनसोडे यांनी मलेशियातील बौध्द परिषदेमध्ये सहभाग घेतला त्यामुळे सी आर सांगलीकर ग्रुप तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. बाळासाहेब कर्पे, सुरेश माने आदी.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.