दिल्लीतील महिलेने राहुल गांधींच्या नावे केले आपले घर..
नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेचे सदस्यत्व गमावल्यानंतर त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस देण्यात आली आहे. याबाबत दिल्ली काँग्रेस सेवा दलाच्या नेत्या राजकुमारी गुप्ता यांनी त्यांचे चार मजली घर राहुल गांधी यांना देऊ केले. राजकुमारी गुप्ता या दिल्ली काँग्रेस सेवा दलाच्या महिला शाखेच्या प्रमुख आहेत.
माझ्याकडे चार मजली घर आहे, आमची वसाहत राहुलच्या आजी इंदिरा गांधी यांनी स्थापन केली होती. सध्या भाजप त्यांच्यावर खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळेच त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे आणि बंगला रिक्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे. आम्ही हे सहन करणारा नाही. ” अशी प्रतिक्रिया राजकुमारी गुप्ता यांनी एका वृत्तसंस्थेला बोलताना दिली.
मी माझे घर राहुल गांधींच्या नावावर केले आहे. त्यांनी याचा स्वीकार करावा यासाठी मी त्यांची भेट घेणार असलयाचे देखील यावेळी राजकुमारी गुप्ता यांनी सांगितले. तसेच आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान भाजपची सत्ता नक्कीच जाईल असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यापूर्वी तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी यांनी राहुल गांधींना आपल्या घरी राहण्याचे निमंत्रण दिले होते. रेड्डी यांनी ट्विट करत, आमचे घर हे तुमचेही आहे.. आपण एक कुटुंब आहोत तुमचे माझ्या घरी स्वागत आहे असे म्हंटले होते. यामुळे आता राहुल गांधी नेमकं कोणत्या घरी स्थलांतरित होणार याकडे संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.