भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त भव्य शोभायात्रा व रक्तदान शिबिराला प्रतिसाद
सांगली "अहिंसा परमो धर्म" हा संदेश देणाऱ्या २४ वे तिर्थकर भगवान महावीर यांच्या २६२२ व्या जयतीनमित्त शहरात सकल जैन समाजाचे वतीने भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. सकल जैन समाज्याच्या एकत्रीत शोभा यात्रेचे हे ३४ वे वर्ष आहे. यामध्ये दिगंबर, श्वेतांबर तेरापंथी या सह सर्व पंथाच्या जैन धर्मियांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. अमिझरा पार्श्वनाथ देहरासर ट्रस्ट व जैन सोशल ग्रुप यानी कच्छी जैन भवन येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३५० हून अधिक जणांनी रक्तदान केले. सकाळी ७:३० वाजता आमराई येथून शोभायात्रा सुरु झाली.
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त निघालेल्या या भव्य शोभा यात्रेत चित्ररथ घोडे, चादीचे रथ आकर्षक सजावटीनी सजवलेली भगवान महावीर यांची पालखी, पंचमेरू याचा समावेश होता. या भव्य शोभा यात्रेत हजारो युवक महिला व पुरुषानी सहभाग घेतला. शेठ रा. घ. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग मधील विदयार्थ्यांनी सोवळे परिधान करून "भगवान महावीर" यांच्या जयघोषात पालखी खादयावरुन वाहीली. जैन महिलाश्रमचे विदयार्थीनी फेटे बांधुन झांजपथकासह भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत होते. जैन मंदिरात सकाळपासून दुग्धाभिषेक पुजा अर्चा, इ. कार्यक्रम झाले. जैन कच्छी भवन येथील रक्तदान शिबिरासाठी सिध्दीविनायक रक्तपेढी यांनी मदत केली. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने सिव्हील हॉस्पिटल, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, रिमाडहोम येथे अन्नदान, फळवाटप आणि औषध दान करण्यात आले. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या बंधु भगिणिना शहरातील व्यापारी बघुनी पाणी, सरबत वाटपाचे नियोजन केले होते.
या भव्य मिरवणुकीत शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग, भगवान नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर, नेमिनाथनगर, भगवान पार्श्वनाथ दिगबर जिनमंदिर, गावभाग, भगवान शांतिनाथ दिगंबर जिनमंदिर, दत्तनगर, भगवान पार्श्वनाथ दिगबर जिनमंदिर, पार्श्वनाथनगर, पार्श्व पदमावती मंदिर, पदमावती कॉलनी धामणी रोड, श्रीमती कळंत्रेआक्का जैन श्राविकाश्रम, जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, श्री. महावीर स्वामी जैन श्वेतांबर जैन मुर्तीपूजक संघ, सांगली श्री अमिझरा पार्श्वनाथ देहारासर ट्रस्ट, शत्रुजय आदिश्वर जैन श्वेताबर मूर्तीपूजक संघ, जैन श्वेतांबर स्थानकवासी संघ, कच्छी जैन श्वेतांबर संघ या संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते.
या भव्य मिरवणुकीत दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब जि. पाटील, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील माजी महापौर सुरेश पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील (मजलेकर), जैन बोर्डिंग चेअरमन प्रा. राहूल चौगुले, सेक्रेटरी अॅड. मदन पाटील, जॉ. सेक्रेटरी संदिप हिंगणे, जैन श्वेतांबर देहरासर मंदिर अध्यक्ष सुभाष शहा, सेक्रेटरी, रोहन मेहता, रविंद्र वळवडे, राजेश पाटील प्रवीण वाडकर, श्री. शांतिनाथ नंदगांवे, जैन बोर्डींग मंदिर कमिटीचे अध्यक्षा कुसुम चौधरी, सचिव प्रमोद पाटील, संदिप आवटे अचलगच्छ देहरासरचे अध्यक्ष जे. पी छेडा, जैन सोशल ग्रुपचे सुशांत शाह, प्रसन्न शहा, धनंजय आरवाडे, आदिनाथनगर श्वेतांबर जैन मंदिरचे अध्यक्ष नागराजभाई छाजेड, शरद शहा, दिलीप रेटरेकर, जतीन शहा, महावीर बन्साली, जितेंद्र जैन श्रीमती कळंत्रेआक्का जैन महिलाश्रमचे चेअरमन श्रीमती अनिता पाटील, सेक्रेटरी, श्रीमती छाया कुंभोजकर, महिला परिषद पदाधिकारी, सदस्य इ. उपस्थित होते. तसेच या मिरवणुकीमध्ये माजी राज्यमंत्री आम विश्वजीत कदम, आम. सुधीर गाडगीळ, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, पृथ्वीराज पाटील विशाल पाटील, पृथ्वीराज पवार, तसेच सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.