Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

टरबूजवर मीठ टाकून खाताय? आधी हे वाचा

टरबूजवर मीठ टाकून खाताय? आधी हे वाचा


महाराष्ट्रामध्ये कलिंगड व टरबूज ही दोन पिके घेतली जातात. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे ७०० हेक्टर क्षेत्रावर केली जाते. महाराष्ट्रात दोन्ही पिके उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती पीक म्हणून घेतले जाते. कच्च्या कलिंगडाची भाजी तसेच लोणच्यासाठी उपयोग केला जातो. कलिंगडाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते. खनिजे व जीवनसत्वे काही प्रमाणात असतात.

उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची ढीग दिसून येतात बाहेरून हिरवे असणारे कलिंगड तथा टरबूज आतून लाल असते. शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी उन्हाळ्यात टरबूजाला चांगली मागणी असते, परंतु टरबूज कसे आणि कशा सोबत खावे याचे काही नियम आहेत. साधारणतः काही फळे खाताना त्यासोबत बीट लावून खाल्ले जाते. विशेषतः काकडी, कैरी, चिंच, बीट, लिंबू ही फळे मीठ लावून खाल्ली जातात. तसेच कलिंगडाला देखील मीठ लावून खाल्ले जाते. परंतु मीठ लावून कलिंगड खाणे धोकादायक आहे, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

महत्त्वाचे म्हणजे कलिंगडातील पोषक तत्त्वांचा फायदा घ्यायचा असेल तर चुकूनही त्यावर मीठ टाकून खाण्याचा प्रयत्न करू नका. त्यापेक्षा कलिंगडाच्या मूळ चवीचा आनंद घ्या. मिठामुळे तुमचे शरीर कलिंगडातील सर्व पोषण ग्रहण करू शकत नाही, म्हणूनच कलिंगड खाताना किंवा खाल्ल्यानंतर लगेच मीठ किंवा मीठजन्य पदार्थ खाऊ नका. त्याचप्रमाणे अंडी किंवा तळलेले पापड किंवा भजी असे पदार्थ कलिंगडासोबत किंवा त्यानंतर किमान अर्धा तास खाऊ नका. तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खाल्ल्याने कलिंगडाच्या रसाचा पूर्ण फायदा मिळत नाही.

टरबूज जास्त शिळे झाले तर त्याचा वास येऊ लागतो तसेच त्यातून खराब निघते, परंतु ताजे टरबूज चवीला चांगले असते. टरबूज जितके रसदार असेल तितके त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. तसेच आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कापलेल्या फळांवर मीठ शिंपडले की ते पाणी सोडू लागते. यामुळे फळांमधील पोषक तत्त्वे निघून जातात. त्याचबरोबर मीठ किंवा चाट मसाल्यामध्ये असलेले सोडियम किडनीवर परिणाम करते. कारण फळांवर चाट मसाला आणि मीठ दोन्ही टाकून खाल्ले तर शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त होऊन ते शरीरासाठी नुकसानदायक आहे. मुळात

फळ नैसर्गिकरित्या गोड असतात. फळांमध्ये ग्लुकोज असते. यामुळे फळांचे सेवन केल्याने शरीरात कॅलरीज वाढतात. मात्र फळांवर अधिक साखर टाकून खाल्ली तर शरीरात साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे मधुमेहाची समस्या उद्भवू शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फारच हानीकारक आहे. तसेच त्यामुळे वजन वाढते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.