शिवसेना कोणाची हे पाकिस्तानही सांगेल पण..
शेपट्या धरून आपटायच्या आहेत
काही लोकांना वाटलं होतं की ते म्हणजेच शिवसेना. अरे हट! म्हणे सभेत घुसणार. अशा घुशी आम्ही खूप पाहिल्या आहेत. पण निवडणुकीच्या रिंगणात अशा घुशी खोदून, शेपट्या धरुन राजकारणात आपटायच्या आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला.
गेलेल्या गद्दारांना काही वाटत नाही
40 गद्दार गेले तर काही वाटत नाही. पण आर ओ तात्या यांच्या निधनाने खूप वाईट वाटलं. आर ओ तात्या यांनी वैशाली ताई यांची जी ओळख त्यावेळी सांगितली तेव्हा कळलं नव्हतं. पण आज वैशाली ताई यांनी ती ओळख दाखवून दिली, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
गुलाबो गँग कोण?
वैशाली ताई यांनी एक पाकिट दाखवलं. त्यामध्ये बुरशी आहे. ती मातीत टाकली की पीक कसदार येतं. चांगलं पीक आल्यानंतरही त्याला कीड लागली तर त्याला मारण्याचं औषध ही आर ओ तात्या यांनी हातात देवून ठेवलेली आहेत. कारण कसता तुम्ही, निवडणूक आल्यावर तुम्ही प्रचार करता, तुम्ही मरमर राबता, आणि हे पिकोजी वरती बसतात, त्यांना संजय राऊत गुलाबो गँग म्हणतात, असा टोला त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर लगावला.
भगव्यावरील कलंक धुवायचा आहे
यांना वाटतं आपण घोड्यावर बसलो. घोड्यावर बसल्यावर घोड्याच्या लाथा तुम्ही खायच्या आणि तुम्ही आरामात बसायचं हे आता नाही चालणार. जसं घोड्यावर चढवलं होतं ना, तसं आता खाली पुन्हा खेचण्याची वेळ आली आहे. निवडून दिलेले गद्दार झाले पण निवडून देणारे आजही माझ्यासोबत आहेत. ज्यांनी आपल्या भगव्याला कलंक लावला तो कलंक धुवायचा आहेच. पण तो कलंक लावणारे हात ही राजकारणात कायमचे गाढून टाकायचे आहेत. या गर्दीला नुसता अर्थ नाही. लोकं आता बोलायला लागले आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.