तलवार उगारणारा वाहतूक पोलिस निलंबित
पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात मद्यधुंद अवस्थेत भर रस्त्यात तलवार उगारून दहशत माजविणाऱ्या वाहतूक पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे. भर रस्त्यात तलवार उगारून दहशत माजवल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय उर्फ करण लक्ष्मण जाधव असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीसाचे नाव आहे. जाधव हा मुंढवा वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. धानोरीतील जाणता राजा चौकात जाधव तलवार घेऊन दहशत पसरवत असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जाधव याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत जाधव याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जाधव याची चौकशी करण्यात आली. जाधव याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याने त्याला निलंबित करण्याचे आदेश वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.