लोकशाही दिनातील गुंठेवारी नियमितीकरन प्रकरण : घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्य समिती नियुक्त
लोकशाही दिनातील गुंठेवारी नियमितीकरन प्रकरण : घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्य समिती नियुक्त : उपआयुक्त स्मृती पाटील करणार प्रकरणाची चौकशी : तात्काळ चौकशी अहवाल देण्याचे आदेश : चौकशी अहवाल येताच दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करणार : महापालिका आयुक्त सुनील पवार यांची माहिती
सांगली : महापालिकेच्या लोकशाही दिनामध्ये घडलेल्या घटनेनंतर आयुक्त सुनील पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्य समिती नियुक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मिरज उपायुक्त स्मृती पाटील यांनी करावी आणि तात्काळ चौकशी करून तो अहवाल सादर करण्याचे आदेशही आयुक्त सुनील पवार यांनी दिले आहेत. दरम्यान, उपआयुक्त स्मृती पाटील यांच्या एक सदसिय समितीचा अहवाल येताच गुंठेवारी नियामितीकरणाच्या फाईलबाबत जो कोणी दोषी ठरेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले.
सोमवारी लोकशाही दिनामध्ये गुंठेवारी निमितीकरणावरून झालेल्या घटनेनंतर आयुक्त सुनील पवार यांनी महापालिकेत नगररचना विभागाची बैठक घेतली. या बैठकीत आयुक्त पवार यानी गुंठेवारी नियमित करण्यासाठी महापालिकेकडे प्रलंबित असलेल्या फायलींचा आढावा घेतला. यामध्ये लोकशाही दिनामध्ये ज्या तक्रारदाराची गुंठेवारी नियमितीकरण करण्याबाबत तक्रार होती, लोकशाही दिनात आलेल्या त्या फाईलबाबत सुद्धा आयुक्त सुनील पवार यांनी माहिती घेतली.
तसेच दाखल असलेल्या त्या फायलीबाबत 2012 पासून ते घटना घडेपर्यंत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि त्याचा सविस्तर अहवाल तात्काळ सादर करावा यासाठी आयुक्त सुनील पवार यांनी उपायुक्त स्मृती पाटील यांची एक सदस्य समिती नियुक्त केली आहे. उपायुक्त स्मृती पाटील यांनी तातडीने संबंधित प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी आणि जो अहवाल सादर करावा असेही आयुक्त पवार यांनी सूचित केले आहे.दरम्यान, त्या प्रकरणाचा चौकशी अहवाल आल्यानंतर या प्रकरणांमध्ये संबधित फायल जमा झाल्यापासून ते घटनेच्या दिवसापर्यंत जो कोणी अधिकारी किंवा कर्मचारी यांनी दिरंगाई केली असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही आयुक्त सुनील पवार यांनी दिला आहे. या बैठकीत उपायुक्त स्मृती पाटील , सहायक संचालक नगररचना विनय झगडे, सहायक आयुक्त नितीन शिंदे व नगररचना विभागाचे सर्व अधिकारी , शाखा अभियंता आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.