पत्नीचा वाढदिवस विसरला तर पाच वर्षे कारावास.
वॉशिंग्टन: आधुनिक जगामध्ये कौटुंबिक वातावरण जपण्यासाठी आणि कुटुंब व्यवस्था टिकण्यासाठी एकमेकांचे वाढदिवस लक्षात ठेवून ते साजरे करणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया मानली जाती. अनेक वेळा पती आणि पत्नीमध्ये भांडणाचे प्रमुख कारण हे एकमेकांचे वाढदिवस विसरणे हेच असते.
अशाप्रकारे पती किंवा पत्नी एकमेकांचे वाढदिवस विसरले तर काही काळ भांडण होऊन नंतर ते मिटूही शकते पण जगाच्या पाठीवर असा एक देश आहे त्या ठिकाणी पत्नीचा वाढदिवस जर पती विसरला तर त्याला पाच वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
पॅसिफिक महासागरामध्ये सामोआ नावाचे हे छोटेसे बेट असून या देशात हा कायदा करण्यात आला आहे. हा कायदा फक्त पतींनाच लागू आहे म्हणजे पती जर आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरला तर त्याच्यावर ही कारवाई करण्यात येते पत्नींसाठी हा कायदा लागू नाही, जर या देशामध्ये एखादा पती पहिल्यांदा आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरला तर त्याला फक्त ताकीद दिली जाते. पण हाच गुन्हा त्यांना दुसऱ्यांदा केला तर त्याला जास्तीत जास्त पाच वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
महत्वाची गोष्ट म्हणजे सामोआ सरकारने या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे या पथकाकडे अशा प्रकारच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर चौकशी पूर्ण करून गुन्हेगार पतीला शिक्षा ठोठावण्याचे काम करते. सामोआ अत्यंत छोटा देश असून तो दोन बेटांमध्ये वसला आहे. या देशाची लोकसंख्या फक्त सव्वा दोन लाख आहे. पण हे एक सुंदर पर्यटन केंद्र असल्याने जगाच्या पाठीवरील अनेक लोक भेट देत असतात पण हा कायदा फक्त स्थानिक नागरिकांनाच लागू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.