Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पतीने पार्लरला जाण्यास विरोध केल्याने पत्नीने केली आत्महत्या

पतीने पार्लरला जाण्यास विरोध केल्याने पत्नीने केली आत्महत्या


मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. नवऱ्याने ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मध्यप्रदेशातील इंदूरमधील एरोड्रम परिसरातील ही घटना आहे. रीना यादव (34) असे मृत महिलेचे नाव आहे. पतीचे बलराम नाव आहे. बलराम आणि रीनाच्या लग्नाला 15 वर्ष झाली होती. बलराम टेलरचे काम करतो. रीनाला ब्युटी पार्लरला जायचे होते, त्याबाबत तिने बलरामला विचारले. पण त्याने काही कारणाने नाही सांगितले. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

बलरामने पोलिसांना सांगितले की, रीनाला ब्युटी पार्लरला जाण्यासाठी भांडत होती. पण बलरामने तिला स्पष्य नाही सांगितले. नकार दिल्याने संतापलेल्या रीनाने गळफास घेतला. पोलिसांच्या पथकाला शेजाऱ्यांनी सांगितले की, दोघांमध्ये कायमची भांडणे व्हायची. बुधवारी असेच भांडण झाले आणि रीनाने खोलीचा दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ तिने दरवाजा न उघडल्याने खिडकीतून पाहिले असता रीनाने गळफास घेतला होता. त्यानंतर दरवाजा तोडून तिला खाली उतरविण्यात आले होते. तपास अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, क्षुल्लक कारणावरुन नवरा बायकोत लाद झाला आणि महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपविण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.