Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलिस आयुक्तचा अधिकार्‍यांना इशारा


पोलिस आयुक्तचा अधिकार्‍यांना इशारा 

नाशिक: पोलिस ठाण्यामध्ये तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तक्रार नोंदविली गेलीच पाहिजे. तक्रार नोंदविली गेली तरच गुन्हेगारीला आळा बसू शकेल. तसेच, संशयितांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करता येत

तक्रारींची नोंद करण्यास टाळाटाळ केली जात असेल तर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देतानाच, पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवून घेत नसल्याचे संबंधितांनी थेट आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे. नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये गुन्हेगारी घटना घडत असताना, अनेकदा पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारींची नोंद होत नसल्याचे प्रकार उघडकीस आलेले आहेत. यासंदर्भात पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

पोलिस आयुक्तालयात पोलिस ठाण्यांच्या प्रभारींच्या आढावा बैठकीत आयुक्त शिंदे यांनी, पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार घेऊन येणाऱ्यांच्या तक्रारींची नोंद झालीच पाहिजे. तक्रार न घेतल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची तंबीच दिली आहे. दिवसेंदिवस शहर वाढते आहे. लोकसंख्याही वाढते आहे. त्यामुळे कौटुंबिक कलह, चोऱ्या-माऱ्या, हाणामाऱ्या अशा स्वरूपाच्या घटना घडणे स्वाभाविक आहे. त्यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी नागरिक पोलिस ठाण्यात आल्यास त्यांची तक्रार नोंदवून घेणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे.

तसे होत नसेल तर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनीही कोणाचीही वा कोणतीही भीती न बाळगता पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. असेही आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.