Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मलाही मुख्यमंत्री व्हायचे आहे; रामदास आठवले

मलाही मुख्यमंत्री व्हायचे आहे; रामदास आठवले 


सांगली: मलाही मुख्यमंत्री व्हायचे आहे अशा शब्दात राज्यात सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीवरून केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला. सांगली दौर्‍यावर आलेल्या केंद्रिय राज्यमंत्री आठवले यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, भावी मुख्यमंत्री म्हणून होत असलेली फलकबाजी हास्यास्पद असून मलाही मुख्यमंत्री व्हावे असे वाटते, मात्र, त्यासाठी आपली ताकद असेल तरच हे शक्य आहे.

सद्यस्थितीमध्ये विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना त्यांच्या गटातून संधी मिळेल असे वाटत नाही. आम्हालाही त्यांची आवश्यकता नाही. अजितदादा व सुप्रियाताई यांच्यात सध्या चढाओढ सुरू आहे. मात्र, जोपर्यंत मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत तोपर्यंत अन्य कोणाला संधी मिळेल असे वाटत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची वेळ आल्याचे सांगितले आहे. त्यांनी आता ठोस निर्णय घेउन एनडीएसोबत यायला हवे. ते जेष्ठ व अनुभवी नेते आहेत. मी आता एनडीएसोबत आहे, मग पवार यांनीही यायला हरकत कसली? त्यांनीच आता ठोस भूमिका घ्यावी.

उद्धव ठाकरे आपले मित्र आहेत, तसेच ते सुसंस्कृत आहेत. त्यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ४०आमदारांवर होत असलेली जहरी टीका अमान्य आहे. त्यांनी बोलताना भान ठेवून बोलण्याची गरज आहे असे मतही त्यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर व्यक्त केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.