राहुल गांधींनाही जीवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली: गेल्या दिवसांपासून राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकीत वाढ होत आहे. किंवा नेत्यांमागे धमकीचं सत्र सुरुच आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आशिष शेलार, संजय राऊत, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला इंदूर पोलिसांनी अटक केली आहे. दयासिंग उर्फ ऐशीलाल झाम असं 60 वर्षीय आरोपीचं नाव आहे. गेल्या वर्षी भारत जोडो यात्रेदरम्यान ही धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर पोलीस देखील सतर्क झाले आहेत.
मिठाईच्या दुकानाबाहेर पत्रातून धमकी.
दरम्यान, राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या आरोपीला इंदूरमधून अटक पोलिसांनी अटक केली आहे. ही यात्रा मध्य प्रदेशमध्ये दाखल होण्यापूर्वी राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली होती. "मिठाईच्या दुकानाबाहेर मिळालेल्या पत्रावर वाहे गुरू लिहिण्यात आले होते. त्याखाली १९८४मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीचा उल्लेख करण्यात आला होता. या अत्याचाराविरोधात कोणत्याही पक्षाने आवाज उठवला नाही", असे पत्रात मजकूर लिहिण्यात आला होता. यानंतर अज्ञात आरोपीविरोधात भादवी कलम ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल पोलिसांनी केला होता. २४ नोव्हेंबरला आरोपी दयासिंगला अटक करण्यात आली होती.
राजकीय नेत्यांना धमकीच्या फोनमध्ये वाढ.
मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकीत वाढ होत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकातून खंडणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तर भाजपाचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांना असाच जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. आमदार आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. तर अशोक चव्हाण यांनी देखील आपल्यावर पाळत ठेवली जात असून, आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. तर काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नीवर हल्ला करण्यात आला होता. तसेच याआधी संजय राऊतांनी आपणाला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती, असा आरोप केला होता. त्यानंतर आता पुन्हा राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. त्यामुळं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास पोलीस करताहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.