Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जोतिबा यात्रेसाठी तगडा बंदोबस्त: सुनील फुलारी

जोतिबा यात्रेसाठी तगडा  बंदोबस्त: सुनील फुलारी 


जोतिबा यात्रेसाठी तगडा पोलिस बंदोबस्त, तिसऱ्या डोळ्याचीही राहणार नजर
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती

कोल्हापूर: वाडी रत्नागिरी येथील श्री. जोतिबा देवाच्या यात्रेसाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्थेसह विविध पथके यासाठी तैनात करण्यात आली आहेत. अधिकारी आणि कमर्चारी असे मिळून तब्बल दोन ते अडीच हजार पोलिसांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या अन्य ३२ विभागांची पथकेही तैनात करण्यात आली आहेत. या यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी दोन नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत. सवर् प्रकारच्या पथकांसह या संपूणर् यात्रेवर तिसऱ्या डोळ्याचीही नजर असणार आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगली दर्पण शी बोलताना दिले. 

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी सोमवारी संपूणर् बंदोबस्ताची पाहणी केली. मंगळवारीही त्यांनी वाडी रत्नागिरी येथे भेट देऊन बंदोबस्त तसेच अन्य व्यवस्थांची माहिती घेतली. महानिरीक्षक श्री. फुलारी म्हणाले, सोमवारी या यात्रेसाठी नियोजित बंदोबस्ताची पाहणी केली आहे. १० ते १५ हजार वाहनांसाठी पाकिर्गची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यावर पाकिर्ग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक शाखेकडून क्रेन टोईंग व्हॅन याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलिस दलाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. गदीर्वर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे. 

या यात्रेत महिलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीने विशेष पथके तयार केली आहेत. यामध्ये निभर्या पथक, गुन्हेगार महिलांवर नजर ठेवण्यासाठी विशेष गुन्हे अन्वेषण पथक तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय बेवारस तसेच अपहरण केलेल्या मुलांच्या शोधासाठी मुस्कान पथकही तैनात करण्यात आले आहे. महाराष्ट्रव्यतिरिक्त अन्य राज्यातून येणाऱ्या गुन्हेगारांवर वॅच ठेवण्यासाठी विशेष टेहळणी पथक तैनात केले आहे. शिवाय राज्यातील तसेच अन्य राज्यातील रेकॅडर्वरील गुन्हेगारांची छायाचित्रे पथकांकडे देण्यात आली आहेत, असेही श्री. फुलारी यांनी सांगितले. 

यात्रा काळात वाडी रत्नागिरी येथे कोणताही प्रकारचा अवैध व्यवसाय चालणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. शिवाय भामटे, फसवणूक करणारे, करणारे यांच्यावरही विशेष नजर असणार आहे. यात्रा काळात पोलिसांचा सीसीटीव्हीद्वारे वॅच असणार आहे. शिवाय भाविक, पोलिस तसेच अन्य लोकांना सूचना देण्यासाठी पब्लिक अनाऊन्स सिस्टीमही तेथे कायार्न्वित करण्यात आली आहे. साध्या वेशातील पोलिसांचे एक पथकही या यात्रेत असणार आहे. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी स्वयंसेवक, होमगाडर्, स्थानिक लोकांची मदत घेण्यात आली आहे, असेही श्री. फुलारी यांनी सांगितले. 

वाडी रत्नागिरी येथील बंदोबस्ताची रंगीत तालीम घेण्यात आली आहे. शिवाय स्थानिक ग्रामस्थांसोबत समन्वय बैठक घेण्यात आली आहे. या यात्रेत भाविक, ग्रामस्थ यांच्या मदतीसह संपूणर् यात्रेवर वॅच ठेवण्यासाठी दोन नियंत्रण कक्ष उभारण्यात आली आहेत. तेथे पोलिस विभागासह महसूल, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, आपत्ती व्यवस्थापन अशा तब्बल ३२ शासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. यात्रेतील सवर् व्यवस्थांबाबत एक व्हिडिओ पोलिस दलातफेर् जारी करण्यात आला आहे. भाविकांनी त्यातून माहिती घ्यावी, तसेच विविध पथकांच्या प्रमुखांचे मोबाईल क्रमांकही देण्यात आले आहेत. कोणतीही अडचण आल्यास त्या क्रमांकावर संपकर् साधावा असे आवाहनही महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी केले आहे. 

शिफ्टनुसार ड्युटीमुळे अधिकारी, कमर्चाऱ्यांत समाधान

यात्रा काळात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना शिफ्टनुसार ड्युटी देण्यात आली आहे. शिवाय बंदोबस्तावरील पोलिसांसाठी नाश्त्यासह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असेही महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले. दरम्यान शिफ्टनुसार ड्युटी दिल्याने पोलिस अधिकारी, कमर्चाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.