सुषमा अंधारे यांचा मोठा निर्णय, ते वक्तव्य भोवणार
पुणे: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आज संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. पुण्याच्या शिवाजी नगर कोर्टात सुषमा अंधारे संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत
त्यामुळे संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणात अंधारे यांनी शिरसाट यांची महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आता अंधारे या शिससाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या विरोधकांवर आपल्या खास शैलीत टीका करण्यासाठी ओळखल्या जातात. त्या आपल्या प्रत्येक सभेमध्ये विरोधी आमदारांचा आपला भाऊ म्हणून उल्लेख करतात. अंधारे यांच्या याच वक्तव्यवरून त्यांच्यावर टीका करताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली होती.त्यांनी अंधारे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. महिला आयोगाकडे तक्रार संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांनी त्यांची तक्रार महिला आयोगाकडे देखील दाखल केली होती. महिला आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर आता आज अंधारे संजय शिरसाट यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.