सुधीरदादांमुळे माझ्या पतीला मिळाले जीवदान
कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे विश्रामबाग कार्यालय वेळ साधारण दीड महिन्यापूर्वी सकाळी 11.45 ची एक महिलेचा दालनात प्रवेश अक्षरशः जोरात रडतच हात जोडून पतीला वाचवण्याची तिची विनंती दादा आणि त्यांचे स्वीय सहायक गहिवरले दादांनी महिलेस शांत करत विचारपूस केली. हकीकत ऐकून दादांकडून तिला धीर. महिला खंबीर होत बाहेर पडली.
सुधीरदादांचेच कार्यालय शनिवार अक्षय तृतीयेची सायंकाळ दादांना त्या महिलेचा फोन काही वेळातच महिला तिचा पती व कुटुंबिय दाखल.दोघांनी दादांच्या पायावर डोके टेकले. दोघांच्या आनंदाश्रूचा बांधच फुटला दादा केवळ तुमच्यामुळेच माझा पती जीवंत असल्याचे महिलेने सांगितले. पतीनेही मनोमन आभार मानले. दादांनी हसत हसत दोघांना अक्षय तृतीया व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छांसह निरोप दिला. या दोन ह्रदयद्रावक प्रसंगामधील कहाणी ऐकून कार्यसम्राट दादा जीवरक्षकही असल्याची प्रचिती आली. या खऱ्याखुऱ्या प्रसंगातील
महिलेचे नाव कल्पना कैलास खोत असून माहेर औरंगाबाद तर सासर कवठेमंकाळ आहे. सध्या सांगलीत वास्तव्यास असलेल्या महिलेच्या पतीस आजारपणामुळे सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले होते. पुढील उपचारासाठी मिरजेतील डॉक्टर पृथ्वीराज मेथे यांच्याशी चर्चा करून उषःकाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पतीची प्रकृती गंभीर असल्यामुळे तसेच आर्थिक अडचणीमुळे महिलेने सुधीरदादांना भेटून मदत मागितली. सर्व नातेवाईकांनी आशा सोडल्याचे सांगत तिने दादांना विनवणी केली.
दादांनी विलंब न करता डॉ. मेथे यांच्याशी संपर्क साधत रुग्णाची संपूर्ण माहिती घेतली. रुग्णाचे फुप्फुस 80 टक्के इन्फेक्टेड असून फक्त 20 टक्केच काम करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 15 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असलेल्या खोत यांच्यावर उपचार सुरु ठेवायला सांगून आवश्यक ती मदत करण्याची तयारी दर्शवली. उषःकाल हॉस्पिटलचे डॉक्टर परीख यांच्याशी ही चर्चा करुन रुग्णावर पैशाअभावी उपचार थांबता कामा नये असे सांगितले. स्वत:ही दोन वेळा समक्ष जाऊन श्री. खोत यांना धीर दिला.
तब्बल 35 दिवस उपचार सुरु होते. जवळपास 4 लाख 20 हजार रुपये खर्च दादांनी मदतीचा स्वरूपात केला. सर्वांचे प्रयत्न आणि श्री. खोत यांची जीवनरेषाही मजबूत असल्यामुळे ते ठणठणीत बरे झाले. अक्षरश : मृत्यूच्या दाढेतूनच ते परतले. कार्यसम्राट दादांनी आजवर शेकडो जणांना मदत केली आहे. ते केवळ विकासकामे करणारे कार्यसम्राटच नव्हे तर जीवरक्षक असल्याचेही या प्रसंगातून दिसून आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.