सांगली बाजार समितीत महाविकास आघाडीच; भाजपाचा धुव्वा
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास निर्विवाद सत्ता देशातील अग्रगण्य बाजार समिती मानल्या जाणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने निर्विवाद सत्ता मिळवली आहे.
या निवडणूकीत विरोधी भाजपाच्या गटास एकही जागा मिळवता आलेली नाही.
या निवडणुकीत भाजपाचे कामगार मंत्री सुरेश खाडे , खासदार संजयकाका पाटील ,माजी आमदार विलासराव जगताप यांनी मविआच्या नेत्यांपुढे आव्हान उभे केले होते. मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री विश्वजीत कदम , काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील , माजी मंत्री अजित घोरपडे यांचे नेतृत्व स्विकारात महाविकास आघाडीला निवडणूकीत दणदणीत विजय मिळवून दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.