इंदुरीकर महाराजांच्या मानधनावरील टीकेला गौतमी पाटीलचं एका वाक्यात उत्तर
सोलापूर : नृत्यांगणा गौतमी पाटीलने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या टीकेला पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “ते महाराज आहेत. मी काय बोलणार त्यांच्याविषयी… फक्त गैरसमज नका करु. महाराजांचा गैरसमज झाला आहे. माझं मानधन एवढं नाही. प्रेक्षकांनीही हे ध्यानात घ्यावं. महाराजच नव्हे तर कुणीही काही बोललं टीका केली तरी माझं काम सुरु आहे. मला काही अडचण नाही. कारण माझं मला माहिती आहे.
मी कशी आहे. मी मानधन किती घेते ते. मी तीन गाण्याला तीन लाख घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केलं नसतं, असं गौतमी पाटील म्हणाली आहे. माझ्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असते. प्रेक्षक उपस्थित राहुन इन्जॉय करतात. आम्ही 11 मुली आणी अन्य अश्या 20 जणांची आमची टीम कार्यक्रमात असते. इतकी मोठ्या गर्दी होत असेल तर मी माझ्यासाठी मला संरक्षण मागणारच ना, असंही गौतमी म्हणाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.