Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

समृद्धी महामार्गावर पोलीस जीपला अपघात; महिला पोलिस निरीक्षक ठार

समृद्धी महामार्गावर पोलीस जीपला अपघात



वर्धा : परभणी येथून आरोपी घेऊन नागपूर येथे जाणारे पोलिस वाहनाने ट्रकला मागून धडक दिली. समृद्धी महामार्गावर पांढरकवढा गावानजीक शनिवारी सकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान ही घटना घडली. अपघातात महिला पोलिस निरीक्षक ठार झाल्या तर तीन कर्मचारी आणि आरोपी गंभीर जखमी झाले.

पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण असे मृताचे नाव आहे. तर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुखविंद्रसिंह, मिट्टू जगडा, चालक शम्मी कुमार आणि आरोपी र्वैद्यनाथ शिंदे हे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हरयाणा येथील पंचकुला पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण आणि त्यांचे तीन कर्मचारी परभणी येथून फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी वैद्यनाथ शिंदे याला घेऊन (एचआर. ०३ जी. व्ही. १७८२) बोलेरोने नागपूरकडे जात होते. समृद्धी महामार्गाने जात असताना पांढरकवडा गाव परिसरात पोलिस वाहन समोरील (एम एच १७ बी. झेड. ६५७७) ट्रकला पाठीमागून धडकले. या भीषण अपघातात पोलिस वाहनाचा समोरील भाग चक्काचूर झाला. या अपघातात पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर पोलिस कर्मचारी व आरोपी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलिस अपघातस्थळी दाखल पोलिसांनी अटक केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.