Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आईच्या उपचारासाठी दोन मुलींनी देहविक्रीचा निर्णय

आईच्या उपचारासाठी दोन मुलींनी देहविक्रीचा निर्णय 


कल्याण: पैशाची गरज माणसाला काही करण्यास भाग पाडते. याचेचे एक उदाहरण कल्याणमध्ये समाेर आले आहे. दाेन मुलींना पैशाची गरज हाेती. त्यांनी देहविक्रीचा निर्णय घेतला. दीड लाखात या दाेन मुलींचा साैदा करणाऱ्या दाेन महिला दलालांना पाेलिसांनी अटक केली आहे. ठाणे मानवी तस्करी विराेधी पथक आणि कल्याण महात्मा फुले पाेलिसांनी ही कारवाई केली.अटक करण्यात आलेल्या महिला दलालांची नावे अंजू सिसाेदिया आणि सरीता सिसाेदिया अशी आहेत. या दाेघीही नवी मुंबईत राहतात.

पीडित मुलींपैकी एका मुलीची आई मध्यप्रदेशात राहते. ती आजारी आहे आईच्या उपचारासाठी पीडित अल्पवयीन मुलीला दीड लाखांची गरज होती. तिने अनेक ठिकाणी मदत मागितली. मात्र तिला मदत मिळाली नाही. अखेर तिने देह विक्रीचा निर्णय घेतला. तिने दलाल महिलांना संपर्क साधला. या दलाल महिलांनी तिच्या मजबूरीची फायदा घेत आणखीन एका मुलीलाही त्यांच्या जाळयात आेढले. तिला देखील पैशाची गरज हाेती. 

ठाणे मानवी तस्करी विभागाचे अधिकारी महेश पाटील यांना माहिती मिळाली होती की दोन महिला या ग्राहकांच्या शोधात आहेत.. त्या कल्याण मधील एका लॉजवर येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी खोटे ग्राहक तयार करत लॉजमध्ये सापळा रचला. या लॉजवरून एका तरुणीसह एका अल्पवयीन मुलीची सुटका केली. तर या दोघींना देह व्यापार करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या दोन महिला दलालांना पाेलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या दलाल महिलांना महात्मा फुले पाेलिसांच्या ताब्यात दिले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.