सांगलीत विमानतळासाठी राज्यपालांकडे मागणी
सांगली : कवलापूर येथील नियोजित विमानतळासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील विविध प्रश्नांबाबत राज्यपाल रमेश बैस यांच्याशी जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी आज चर्चा केली. विमानतळाचा मुद्दा सांगलीकरांच्या ऐरणीवर असल्याचेही त्यांनी राज्यपालांना सांगितले. याप्रश्नी सकारात्मक चर्चा झाली. राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच समित कदम यांनी आज त्यांची मुंबईतील विधानभवन येथे भेट घेतली. त्यावेळी विविध प्रश्नांबाबत श्री. कदम चर्चा केली. प्रामुख्याने सांगलीत येणाऱ्या महापुराबाबत कोणत्या उपाययोजना करता येतील. कृष्णेला महापूर येऊ नये, यासाठी संबंधित विभागामार्फत कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.