Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बनावट पेटीएम स्कॅनरद्वारे फसवणूक करणाऱ्यास अटक

बनावट पेटीएम स्कॅनरद्वारे फसवणूक करणाऱ्यास अटक


सांगली: पेटीएम स्कॅनर फुकट तयार करून देतो असे सांगून बनावट स्कॅनरद्वारे गंडा घालणाऱ्यास अटक करण्यात आली. एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. त्याच्याकडून ४० हजारांची रोकड, एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

अतिक इलाई मुल्ला (वय २२, रा. खणभाग, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॅ. बसवराज तेली यांनी फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयितांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी पथकाला सूचना दिल्या होत्या. दि. २७ माचर् रोजी मौजे डिग्रज येथील एका गॅरेजमध्ये संशयित अतिक मुल्ला गेला. तेथे त्याने गॅरेज चालकास तुम्हाला फुकट पेटीएम स्कॅनर देतो असे सांगितले. त्यानंतर त्यांना स्कॅनरही दिला. नंतर गॅरेज चालकाने त्याचे बॅंकेचे खाते तपासले असता त्यातून १३ हजार रूपये दुसऱ्या खात्यावर वगर् झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत गॅरेज चालकाने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत फियार्द दिली. 

त्यानंतर सायबर पोलिसांनी फियार्दीच्या माहितीनुसार त्याचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर यातील संशयित सांगलीतील बस स्थानक परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला पथकाने ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडून कनार्ळ आणि सांगलीतील असे आणखी दोन गुन्हे उघडकीस आले. त्याला सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मागर्दशर्नाखाली उपनिरीक्षक रोहिदास पवार, महादेव घेरडे, कॅप्टन गुंडवाडे, संदीप पाटील, विक्रम खोत, संतोष गळवे, अमोल ऐदाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.