माझा बिस्मिल्ला करू नका; अब्दूल सत्तार
या मेळाव्यानंतर अब्दुल सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर त्यांनी थेट भाष्य केलं नाही. पण सूचक विधान केलं. मी हनुमानासारखा त्यांचा भक्त असतो तर माझी छाती चिरून दाखवली असती. माझ्या हृदयात विखे पाटील आहेत. विखे पाटील साहेब आहेत…आता एकनाथ शिंदे आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. महसूल खातं त्यांना दिलं आहे. या खात्यामार्फत महत्त्वाची कामे होऊ लागली आहेत, असं सांगतानाच आपला मित्र पुढे जावा असं कोणाला वाटणार नाही? त्यांनी उच्च पदावर जावं. पण त्यांना अडचण होईल असा कोणताही प्रश्न तुम्ही विचारू नका, असं आवाहन अब्दुल सत्तार यांनी केलं.
कामाला गती मिळाली
आमचे सरकार आले आणि राज्याला गती मिळाली. आम्ही ज्या मागण्या केल्या त्या लगेच मंजूर करून निधीही दिला. पायाभूत सुविधा हेच आमच्या सरकारचे कर्तव्य आहे. 1 रुपयामध्ये शेतकरी विमा होईल असे जाहीर केले. या घोषणेची काहींनी टिंगल केली. मात्र त्याला देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारने मंजुरी दिली. असा निर्णय घेणारे देशातील आपले पहिले राज्य आहे, असं सत्तार म्हणाले.
भरपाई लवकरच देणार
प्राथमिक शिक्षणात कृषी शिक्षण राज्यात लागू करण्यात आलं. येत्या शैक्षणिक वर्षात हा नवीन विषय लागू होणार आहे. त्यामुळे चांगले शेतकरी निर्माण होतील. गोपिनाथ मुंडे अपघात विमा दोन लाखाचा आहे. हा विमा मिळायला वेळ जात होता. त्यात सुधारणा केली. आता गावातील कृषी अधिकारी आणि पोलिसांनी निर्णय घेतला की आता पैसे मिळतील, असं सांगतानाच अवकाळी आणि गारपीटीने झालेल्या नुकसानीची लवकरच भरपाई देणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.