निवडणूक प्रचारसभेला जात असताना माजी मुख्यमंत्री कारमधून खाली कोसळले
कर्नाटकात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर 13 मे रोजी निकाल लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी प्रचारात जोर वाढवला आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या कारमध्ये उभं राहून कार्यकर्त्यांना हात उंचावताना तोल जावून खाली पडल्याची घटना आज (शनिवार) घडली. या घटनेनंतर त्यांना कारमध्ये बसवण्यात आलं. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
बूट घसरल्यामुळं तोल जाऊन ते पडल्याचं सांगितलं जात आहे. विजयनगर जिल्ह्यातील कोडलगी विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ते आले होते. यावेळी सिध्दरामय्यांनी कारच्या दरवाज्यात उभं राहून कार्यकर्त्यांना हात उंचावत होते. यावेळी अचानकपणे त्यांच्या चेहऱ्यावर थकवा, अस्वस्थता जाणवली. ते बघता खाली कोसळू लागले.
दरम्यान, दरवाज्याला धरून ते खाली पडत होते. याचवेळी त्यांच्या पाठीमागे उभे असलेले अंगरक्षकांनी व कार्यकर्त्यांनी त्यांना सावरलं. विधानसभा निवडणुकीसाठी सिध्दरामय्यांचा बळारी, विजयनगर, रायचूर, दावनगिरीसह विविध ठिकाणी प्रचार दौरा झाला. आज सकाळी सिंधनूर येथून हेलिकॉप्टरनं कोडलगी इथं आले. यावेळी ते कारमधील खिडकीचा दरवाजा उघडून उभं राहून चाहत्यांना व कार्यकर्त्यांना हात उंचावताना खाली पडले. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाहीये.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.