कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम करणारा नेता; वाळवेकर हॉस्पिटलला भेट
कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम करणारा नेता मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या प्रचाराची लगबग सुरू असताना आपला एक निष्ठावंत कार्यकर्ता सांगली येथे ऍडमिट आहे असे कळाल्यानंतर तात्काळ वाळवेकर हॉस्पिटल येथे माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांनी भेट दिली. आपल्या कार्यकर्त्याला भेटून त्याची विचारपूस करून काळजी करू नका लागेल ती सर्व मदत होईल असे आश्वासन दिले.
डॉक्टर वाळवेकर सरांनी माननीय जयंतराव जी पाटील साहेब यांना चहा घ्यायचा आग्रह केला चहा वर चर्चा करत असताना आयुब भाई यांनी डॉक्टर वाळवेकर यांची माहिती दिली स्वतः सर्जन असून प्रत्येक रुग्णांना ते स्वतः वेळ देतात व मागील दहा वर्षापासून होत असलेल्या महाआरोग्य शिबिराला डॉक्टर वाळवेकर यांची मोलाची साथ असते तसेच योजनेअंतर्गत न बसणाऱ्या शस्त्रक्रिया कमी पैशात व मोफत करून देत असतात माननीय जयंतराव जी पाटील साहेबांनी डॉक्टर वाळवेकर यांचे विशेष आभार मानले व त्यांचे कौतुक केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.