Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग


मुंबई कुर्ला येथून आजीकडे पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने परिसरात खेळणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याचा जाब विचारायला गेलेल्या मुलीच्या आईलादेखील संशयिताने जबर मारहाण केल्याची संतापजनक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. संशयित महेश कौरी हा कुर्ला येथून नाशिकला आला होता.

गुरुवारी (ता. २७) रात्री घरापुढे खेळणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी या संशयिताने अंगलट करण्यास सुरवात करीत तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या मुलीने घरात धाव घेत घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. या वेळी आईने घराबाहेर येत संशयिताला मुलीची छेड काढल्याचा जाब विचारताच संशयिताने थेट मुलीच्या आईवर हल्ला करीत तिला जबर मारहाण केली. तसेच, संशयितांची आजी, बहीण आणि एका महिलेने येऊन मुलीच्या आईला अश्लील भाषेत शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना घडली आहे.

याबाबत मुलीने आणि तिच्या आईने पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेत संशयित महेश कौरी याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पंचवटी पोलिस करीत आहे. घटनेची माहिती पंचवटी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत संशयित महेश कौरी याच्या कुटुंबीयांना विचारणा केली असता उपस्थित सर्वांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत संशयिताला घटनास्थळावरून पळवून लावण्यास मदत केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.