दुचाकी सोडण्यासाठी पोलिस शिपायाने मागितली तीन हजारांची लाच
भंडारा : जुगार अड्ड्यावर धाड घातल्यानंतर पकडलेली दुचाकी सोडून देण्याकरिता पोलीस शिपायाने पाच हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर तीन हजार रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. सचिन गजानन बुधे, असे लाचखोर पोलीस शिपायाचे नाव आहे. तो कारधा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी केली.
माहितीनुसार, एका २२ वर्षीय तक्रारदार हा सालेबर्डी येथील रहिवासी आहे. कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ एप्रिल रोजी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस पथकाने धाड घातली. यात तक्रारदाराची दुचाकी पकडण्यात आली होती. या दुचाकीवर कारवाई करू नये यासाठी तक्रारदाराने कारधा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सचिन बुधे याने कारवाई न करण्याकरिता पाच हजार रुपयांची लाच मागितली. याबाबतची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. प्रकरणाची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. सचिन बुदधे याने तडजोडीयंती तीन हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. तसेच ठाण्यातच पंचासमक्षच तीन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, पोलीस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमित डहारे, पोलीस हवालदार मिथुन चांदेवार, पोलीस शिपाई अतुल मेश्राम, अंकुश गाढवे, चेतन पोटे, विवेक रणदिवे, अभिलाषा गजभिये, राजेश थोटे यांनी केली.
वर्षभरातील पहिली कारवाई -
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे जानेवारी महिन्यापासून या वर्षात केलेली ही प्रथमच कारवाई आहे. तीन महिन्यात कुठलीही तक्रार संबंधित विभागणी प्राप्त झाली नव्हती. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पोलीस खात्याच्याच कर्मचाऱ्यामार्फत लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.