Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सलमान खानने अखेर मौन सोडलं, म्हणाला...

सलमान खानने अखेर मौन सोडलं, म्हणाला...


बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याला मागील काही महिन्यांपासून जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. या प्रकरणावर सलमान खानने पहिल्यांदाच मौन सोडत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सलमान खान याने या प्रकरणावर आधी भाष्य केले नव्हते. मात्र, त्याने धमकीबाबत थेट प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. बुधवारी, सलमान खानने एका पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती. या पत्रकार परिषदेत त्याला मिळणाऱ्या धमकीबाबत विचारण्यात आले होते. तुम्ही सगळ्या देशाचे भाईजान आहात, मग आता मिळणाऱ्या धमकीकडे कसे पाहता, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सलमान खानने उत्तर देताना म्हटले की, मी सगळ्यांचा भाई नाही, काहींचा 'भाई' आहे..तर कोणाचा तरी 'जान' आहे. असे उत्तर देत सलमान खानने धमकीवर थेट उत्तर देणे टाळले.

लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती

'एबीपी'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची उघडपणे धमकी दिली. आमच्या भागात सलमान खानने काळवीट मारल्याचे लॉरेन्सने म्हटले होते. त्याला आमच्या बिकानेरच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल. जर त्याने माफी मागितली नाही तर मी त्याला योग्य उत्तर देईन. मी सध्या गुंड नाही, पण सलमान खानला मारल्यावर गुंडा बनेन, असेही लॉरेन्स म्हणाला होता.

सलमान खानला धमकीचा ई-मेल

यानंतर सलमान खानला धमकीचा ई-मेल पाठवण्यात आल होता. ज्यामध्ये 'गोल्डी भाई (गोल्डी ब्रार) यांना सलमान खानशी बोलायचे आहे. लॉरेन्स बिश्नोई यांची मुलाखत तुम्ही पाहिलीच असेल. बघितली नसेल तर बघायला सांगा. प्रकरण बंद करायचं असेल तर प्रकरण मिटवा. समोरासमोर बोलायचे असेल तर सांगा. आता वेळीच कळवले आहे, पुढच्या वेळी फक्त झटकाच बसेल, अशी धमकी देणारा ई-मेल पाठवण्यात आला होता.

सलमान खानचा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर

सलमान खान लवकरच 'किसी का भाई, किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी ईदच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सलमान खानकडे 'किक 2', 'टायगर 3' सारखे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.