Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अदानी घोटाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे

अदानी घोटाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे 




काँग्रेस पक्षाचे नेते  मा.खा.राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत देशातील शेतकरी, बेरोजगार युवक, शेतमजूर, कामगार, छोटे व्यापारी, फेरीवाले, यांचे प्रश्न समजावून घेऊन संसदेमध्ये ते प्रश्न मांडले.  तसेच अदाणी घोटाळा संदर्भात ही पंतप्रधानांनी उत्तर द्यावे अशी मागणी केली अदाणीच्या उद्योग समूहामध्ये गुंतवलेल्या शेल कंपन्यातील 20 हजार कोटी कोणाचे याचा खुलासा सरकार करत नाही परंतु राहुल गांधी यांच्यावर खोटेनाटे आरोप करुन देशातील जनतेची दिशाभूल करीत आहेत.

त्याकरिता आज संपूर्ण भारतभर प्रत्येक जिल्हा तालुका पातळीवर प्रेस कॉन्फरन्स द्वारे पुढील काळातील *आंदोलन संकल्प सत्याग्रह* बाबत माहिती देण्याचे आयोजन *मिरज तालुका कॉंग्रेसच्‍या* वतीने करण्यात आले. श्री. राहुलजी गांधी यांनी 7 फेब्रुवारीला संसदेत अदाणी घोटाळा संदर्भात प्रश्न विचारले श्री. राहुल गांधीजी, श्री.मल्लिकार्जुन खरगे यांनी अदानी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. परंतु या दोघांच्‍या भाषणाचा भागच संसदीय कामकाजातून वगळण्यात आला. जेपीसीची मागणी केली त्यावेळी विरोधी पक्षाच्या नेते बोलत असता माईक बंद केला होता. संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालून संसद बंद पाडले संसद चालू दिली नाही. परदेशामध्ये श्री. राहुलजी गांधी यांनी भारताचा अपमान केला असे खोटे आरोप भाजपाच्या 6  मंत्र्यांनी केले. त्यावर राहुलजी गांधी यांनी संसदेत उत्तर देण्याची तयारी दाखवली पण त्यांना बोलण्याची परवानगी दिली नाही.

याउलट कर्नाटकातील कोलार येथील 2019 च्या भाषणावरून सुरतच्या कोर्टात दोन वर्षाची शिक्षा देऊन 24 तासाच्या आत खासदारकी रद्द करण्यात आले. ज्या भाषणावरुन केस दाखल केली होती. त्यामध्ये कोणत्याही समुदायाचा किंवा ओबीसीचा उल्लेख केलेला नाही परंतु भाजप व त्यांचे अंधभक्त हे राहुलजी यांना ओबीसींचा अपमान केला म्हणून देशभर घाणेरडे गलिच्छ राजकारण करत आहेत. मोदी सरकार राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करत आहे. आता तर सरकारी घर खाली करण्याचे नोटीस पाठवले आहे. अदानी घोटाळ्याची चर्चाच होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक राहुलजी गांधींवर खोटे आरोप करुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहेत.

यावेळी मिरज तालुका कॉंग्रेसचे अध्‍यक्ष आण्‍णासाहेब कोरे, सांगली जिल्‍हा कॉंग्रेसचे खजिनदार पी.एल.रजपूत सर, अजित ढोले तालुका निरीक्षक, सांगली विधानसभा क्षेत्र निरीक्षक आदिनाथ मगदूम, जिल्‍हा सरचिटणीस सुभाषतात्‍या खोत, कॉंग्रेस सेवादलाचे शहर जिल्‍हा अध्‍यक्ष पै. प्रकाश जगताप, सुरेश मिटकरी,  पंडीत पवार, भिमराव चौगुले इत्‍यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.