मैत्रीण आणि तिच्या आईमुळे अल्पवयीन मुलीचा घात
सांगली : लग्नाचे आमिष दाखवून व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना सांगलीत घडली. पीडित मुलीची मैत्रीण आणि तिच्या आईनेच यात संशयिताला मदत केली. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणारी पीडित मुलीची मैत्रीण आणि तिच्या आईवर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील नराधमास अटक करण्यात आली असून त्याला दि. 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गणेश बाळू रणदिवे (वय 20 रा. पत्रकारनगर, सांगली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हा प्रकार जानेवारी 2023 ते एप्रिल 2023 दरम्यान घडली आहे. याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी हि सांगली शहरात कुटुंबियांसह राहते. संशयित रणदिवे याच्यासोबत पीडितेची डिसेंबर 2022 मध्ये ओळख झाली होती. यानंतर रणदिवे याने अल्पवयीन मुलीसोबत मैत्री केली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या दरम्यान मुलीचे एकांतात आक्षेपार्ह काढलेले फोटो दाखवत सदरचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकवेळा अत्याचार केले. सदरचा प्रकार हा जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याच्या कालावधीत घडला.वारंवार अत्याचार होवून लागल्याने धमकीला आणि अत्याचाराला वैतागलेल्या पीडितेने याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून संशयित गणेश रणदिवे याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तातडीने अटक करण्यात आली आहे. या प्रकारात पीडितेची मैत्रिण व तिच्या आईचा देखील समावेश असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. संशयितासोबत बाहेर वारंवार फिरायला जाण्यास दोघींनी प्रवृत्त केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या दोघींविरुद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.