सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढण्यासाठी पुण्यातील आक्रमक महिला नेतृत्व तयार
पुणे : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर असताना आता अनेकजण निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवत आहेत. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीही बारामतीची जागा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
“बारामती मतदारसंघात भाजप आणि एकनाथ शिंदेंनी विचार केल्यास मी निवडणूक लढवेन. बारामती मतदारसंघात घराणेशाहीचं राजकारण आहे. सुप्रिया सुळे पुन्हा या मतदारसंघात फिरतायेत. यंदाही त्याच उमेदवार असतील.
राज्यात देवेंद्र फडणवीसांच काम चांगलं आहे. त्यामुळे त्यांनी मला संधी द्यावी”, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत. शिंदे-फडणवीस यांनी संधी द्यावी अन्यथा आम आदमी पक्षाकडूनही मला ऑफर आली आहे. पण राष्ट्रीय पक्षानं संधी दिल्यास कोणाला नको असेल?, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.