मध्यरात्रीपर्यंत कोल्हापूर रस्त्यावरील बार चालू; वर्दीचा धाकच राहिला नाही
सांगली : सांगली शहरासह जिल्ह्यात सध्या अवैध व्यवसाय बंद आहेत असे सांगण्यात येत आहे. डॉ. बसवराज तेली यांनी पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार घेतल्यानंतर बऱ्याच अवैध व्यवसायांना चाप बसला आहे. मात्र सांगली शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील अनेक हॉटेलच्या बाहेर मध्यरात्रीपर्यंत खात्याच्या गाड्या तासन तास उभ्या असतात. त्यामुळे सांगलीत खरच अवैध व्यवसाय बंद आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी कार्यभार घेतल्यापासून अवैध धंदे मोडीत काढले आहेत. तरीही जिल्ह्यातील क्राईम रेट वाढत आहे. गुन्हेगारांच्या नशेखोरीमुळे खून, खुनी हल्ला असे प्रकार वाढले आहेत. याला फक्त नशेखोरीच कारणीभूत असल्याचे अधिकारी खासगीत बोलत आहेत.या गुन्हेगारांना नशा करण्यासाठी सांगलीतील कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेल कारणीभूत आहेत. हॉटेल बंद करण्याची रात्री अकाराची वेळ असतानाही मध्यरात्रीपर्यंत ही हॉटेल सुरू असतात. विशेष म्हणजे या हॉटेल बाहेर खात्यातीलच लोकांची वाहने बिनधास्तपणे तासन तास उभी असतात. मग खात्यातील लोकच तेथे मध्यरात्रीपर्यंत उभी असल्यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यात नशेखोरीमुळे खून, खुनाचा प्रयत्न यासह विविध प्रकारचे गुन्हे होत असताना कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेलना विशेष सवलत का दिली जाते असा प्रश्न विचारला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.