कुपवडमध्ये डॉक्टरचा निर्घृण खून
कुपवाड, ता. 26 : कुपवाड ते जुना रस्त्यावरील एका समाज मंदिर परिसरात राहणाऱ्या डॉ. अनिल बाबाजी शिंदे (वय 43) यांचा निर्घृण खून केल्याचा प्रकार आज सकाळी घडला. प्राथमिक तपासात सख्खा भाऊ संपत शिंदे याने संपतीच्या वादातून खून केल्याचे स्पष्ट झाले असून त्याला ताब्यात घेतले आहे.
येथे राहत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डॉ. शिंदे हे मुळचे / कुपवाड वडगाव येथील आहेत. सध्या ते होते. सख्खा भाऊ संपत आणि त्यांच्यात संपत्तीवरुन वाद होता. आज सकाळी साडे आठच्या सुमारास रहदारीच्या परिसरात राहत असलेले डॉ. शिंदे ज्ञानेश्वरीचे वाचन करत होते. तेव्हा घरात घुसलेल्या संपत याने खुरप्याने डॉ. शिंदे यांच्यावर डोक्यावर सपासप वार करुन खून केला.
कुपवाड एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून सख्खा भाऊ संपत याने खून केल्याचे स्पष्ट झाले असून त्याला ताब्यात घेतले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.