दहा वर्षापासुन प्रलंबित फाईलींचा तातडीने अहवाल द्या आयुक्त सुनील पवार यांचे आदेश
नगररचनाकडे दहा वषार्पासून प्रलंबित फायलींचा तातडीने अहवाल द्या सांगली महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांचे आदेश
सांगली : सोमवारी सांगली महापालिकेत झालेल्या लोकशाही दिनावेळी आयुक्तांच्या दिशेने बूट फेकण्यात आला. या घटनेनंतर महापालिका प्रशासन तातडीने जागे झाले आहे. दरम्यान आयुक्त सुनील पवार यांनी नगररचना विभागाकडे दहा वषेर् तसेच त्याहून अधिक काळ प्रलंबित फायलींचा बुधवारी सकाळी साडेदहापयर्त अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मंगळवारपासून नगररचना विभागात धावपळ सुरू आहे.
महापालिकेच्या मुख्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नगररचना विभागाकडे ११ वषार्पासून फाईल प्रलंबित असल्याबाबत कैलास काळे यांनी विचारणा केली. त्यावेळी काम मागीर् लावण्याचे आश्वासन आयुक्त पवार यांनी दिले. मात्र काळे यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी आयुक्तांच्या दिशेने बूट फेकला. त्यानंतर महापालिका कमर्चाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले.या घटनेनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या फियार्दीनुसार काळे यांच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या नागरिकांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र आयुक्तांनी हे प्रकरण गांभियार्ने घेत. नगररचना विभागाकडे दहा वषेर् तसेच त्याहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या सवर् फाईलींचा अहवाल बुधवारी सकाळी साडेअकरापयर्त मागवला आहे. त्याकाळी नगररचना विभागात काम करत असलेल्या अभियंत्यांनाही हे अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत नगररचना विभागाकडे प्रलंबित असलेल्या फाईलींचा युद्धपातळीवर निपटारा होईल अशी चर्चा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.