वानलेसवाडीत माहेरून दहा लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ
सांगली : नोकरीला लावण्यासाठी दहा लाख रुपये माहेरून घेऊन येण्यासाठी तसेच पतीचे असलेल्या अनैतिक संबंधावरून विवाहितेला मारहाण करत तलाक देण्यासाठी छळ केल्याची घटना उघडकीस आली. सदरचा प्रकार हा २७ डिसेंबर २०२० ते १० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत वानलेसवाडी येथे घडला. या प्रकरणी पिडित महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती, सासू, सासऱ्यासह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पती अक्रम बादशाह मुजावर,सासरे बादशाह महम्मद मुजावर, सासू सौ. सरदाबी बादशाह मुजावर, नणंद सौ. कौसर इलाही सनदी (रा. मालगाव), मामे सासरे बाबासाहेब समलेवाले (रा. घनशामनगर) आणि तृप्ती सतीश कुलकर्णी अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे कि, पिडित महिलेचा विवाह अक्रम मुजावर यांच्याशी झाला होता. २७ डिसेंबर २०२० नंतर सुमारे दीड महिन्यांनी संशयित सहा जणांनी संगनमत करुन पती अक्रम मुजावर याचे एका महिलेशी असलेल्या प्रेम संबंधावरुन व इतर कारणावरुन त्याचबरोबर अक्रम मुजावर याला नोकरीसाठी माहेरुनहून दहा लाख रुपये घेवून ये असे म्हणून वारंवार मानसिक व शारीरीक त्रास देत मारहाण शिवीगाळ केली.
वारंवार तलाक देण्याची मागणी करून १० नोव्हेंबर २०२२ या कालावधीपर्यंत पती, सासू, सासऱ्यांसह सहाजणांनी संगनमत करुन जिवे ठार मारण्याची धमकी देत जाचहाट केला. तसेच मामे सासरे बाबासाहेब (बापू) समलेवाले यांनी अश्लिल भाषा वापरली आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पिडित महिलेने विश्रामबाग पो ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पिडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.