आयशर गाडी व दुचाकी यांच्यात अपघात;गरोदर महिला ठार
माळवाडी: पलूस जि.सांगली येथील झेंडा चौका मध्ये आयशर गाडी व प्लेझर गाडीचा अपघात होऊन गरोदर महिला ठार झाल्याची घटना काल सायंकाळी घडली याबाबत भिलवडी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती खालील प्रमाणे.
मृत महिला आपल्या पतीसह दोन मुलांसोबत तासगाव होऊन आष्टा-इस्लामपूरकडे जात होती. माळवाडी (भिलवडी) येथील झेंडा चौकामध्ये आयशर क्रमांक MH42. A.Q. 7414 व दोन चाकी प्लेजर गाडी MH 10 AF. 8667 या बारा चाकी आयशर व दुचाकी गाडीचा अपघात झाला. मयत पुशिदा मनबत शेख वय वर्ष 34 राहणार कासारगर्ल्ली तासगाव या गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे. पती व दोन मुलांसोबत दुचाकी गाडीवरून प्रवास करीत असताना जड वाहतूक आयशर महिलेच्या पोटावरून चाक गेल्याने महिलेला मोठ्या प्रमाणात शारीरिकविजा झाली होती. घटनास्थळी ग्रामस्थांनी प्रसंगाची गंभीरता लक्षात घेऊन ॲम्बुलन्स मधून सांगली जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे ॲम्बुलन्स मधून रवाना केले परंतु सांगली येथील शासकीय रुग्णालयामध्ये जाण्यापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला आहे.डी ता. पलूस जि.सांगली येथील झेंडा चौका मध्ये आयशर गाडी व प्लेझर गाडीचा अपघात होऊन गरोदर महिला ठार झाल्याची घटना काल सायंकाळी घडली याबाबत भिलवडी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती खालील प्रमाणे.. अपघाताची भीषणता इतकी भयानक होती की मृत गरोदर महिलेचा पाय शरीरापासून वेगळा झाला होता पोटावरून चाक गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पतीसोबत व दोन लहान मुलासोबत प्रवास करणाऱ्या आईचा अचानकपणे दुर्दैवी मृत्यू झाल्याने लहान मुलांचा घटनास्थळी आईच्या मायेपोटी हंबर्डा फुटल्याचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.