Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

परिचारिकेशी भर रस्त्यात अश्लील चाळे; प्रेमवीर गजाआड

परिचारिकेशी भर रस्त्यात अश्लील चाळे;प्रेमवीर गजाआड 


नागपूर : मैत्रिणीच्या घरून पार्टी करून परत येणाऱ्या परिचारिकेशी एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अश्लील चाळे करणाऱ्या प्रशांत पांडूरंग कडवे (५०, सोनेगाव) याला सोनेगाव पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २९ वर्षीय विवाहित महिला खासगी रुग्णालयात परिचारिका आहे. प्रशांतचे दोन लग्न झाले असून त्याची पहिली पत्नी पळून गेली तर दुसरी पत्नी दोन मुलांसह सोबत राहते. 
तो एका मोठ्या हॉटेलमध्ये कूक आहे. प्रशांतचे परिचारिकेवर एकतर्फी प्रेम होते. त्याने मोबाईल हरविल्याचे सांगून महिलेला एक फोन करण्यासाठी तिचा फोन मागितला. तिचा भ्रमणध्वनीक्रमांक मिळाल्यानंतर त्याने तिला रोज संदेश आणि फोन करणे सुरू केले. परंतु, ती त्याला टाळत होती. तो गेल्या काही दिवसांपासून परिचारिकेचा पाठलाग करीत होता.

शनिवारी रात्री आठ वाजता ती मैत्रिणीसोबत घरी जात असताना प्रशांतने तिला रस्त्यात अडवले. खासगीत बोलायचे असल्याचे सांगून तिच्या मैत्रिणीला जाण्यास सांगितले. त्याने पुन्हा तिला प्रेमाची मागणी घातली. तिने नकार देताच अंधाराचा फायदा घेऊन तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केल्यानंतर तो पळून गेला. हा प्रकार तिने पतीला सांगितला. दोघांनी सोनेगाव पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी प्रशांतला अटक केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.