मटका सुरू करण्याची मागणी करणाऱ्या तिघांवर गुन्हा
सांगली : महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यात मटका सुरू करण्याची समाजविघातक मागणी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीतील विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली. सर्व संशयित राष्ट्रविकास सेनेचे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत लक्ष्मण गायकवाड, प्रदेशाध्यक्ष अमोस सॅमवेल मोरे, युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत लक्ष्मण सदामते, विक्रम रामचंद्र मोहिते, संजय मोहन लोखंडे, अन्य तीन अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या सर्व संशयितांनी सोमवारी जिल्हाधिकारी कायार्लयासमोर मटका सुरू करण्यासाठी घोषणाबाजी करत आंदोलन केले होते.त्यांच्यावर विश्रामबागचे निरीक्षक मोरे, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार संजय मोटे याबाबत अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.