तेलंगणा भाजप प्रदेशाध्यक्षाला पेपर लीक प्रकरण अटक
तेलंगणातील एसएससी बोर्डाच्या पेपरफुटीच्या प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार बंदी संजय यांना अटक केली. मंगळवारी मध्यरात्री तेलंगणा पोलिसांनी करीमनगर येथील निवासस्थानाहून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी भाजप समर्थकांनी हुल्लडबाजी करत पोलीस कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार बंदी संजय यांच्या अटकेवरून तेलंगणातील राजकीय वातावरण तापले आहे. बंदी संजय यांना बुधवारी दुपारी पोलीस वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनांचा रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. दरम्यान, भाजप आमदार रघुनंदन राव आणि एटाळा राजेंद्र यांच्यासह इतर नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पेपरफुटीविरोधात केसीआर सरकारविरोधात आवाज उठविल्याने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. या कारवाईच्या विरोधात भाजप प्रदेश सरचिटणीस बंगारू श्रुती यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मोदींच्यादौऱ्याआधीकारवाई
हैदराबाद येथे वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 एप्रिलला तेलंगणा दौऱ्यावर आहेत. त्याआधीच भाजप प्रदेशाध्यक्षांना अटक करण्यात आल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय मंत्री किशन रेड्डी तसेच हैदराबादमधील भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा आणि नड्डा यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन चर्चा केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.