गिरजवडे येथे गुरव धर्म वैदिक पोराहित्य संस्कार शाळा आणि सामुदायिक मोजीबंधन कार्यक्रमाचे आयोजन
गिरजवडे येथे गुरव धर्म वैदिक पोराहित्य संस्कार शाळा आणि सामुदायिक मोजीबंधन कार्यक्रमाचे आयोजन श्री जोतीबाचे मुळस्थान म्हणुन धार्मिक महत्व असलेले शिराळा तालुक्यातील गिरजवडे येथे गुरव धर्म वैदिक पोराहित्य संस्कार शाळा गुरूकुल निवासी पध्दतीचे 7 दिवसांचे प्रशिक्षण शिबीर तसेच या शिबीराचा सांगता समारंभ प्रशिक्षणार्थी सह गुरव बटूंच्या सामुदायिक मोजी बंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती ज्ञानदर्शन वैदिक व पौराहित्य संस्कार शाळेचे संस्थापक दत्तात्रय पाटील यांनी दिली. सदरचे गुरूकुल निवासी शिबीर मे महिन्याच्या दुस-या आठवड्यात घेण्यात येणार आहे.
गुरव धर्म संस्कार शाळा गुरूकुल निवासी पध्दतीने होणार असुन प्रथम सत्रातील संस्कार शाळा हि फक्त 25 विद्यार्थ्यांची असेल. या संस्कार शाळेत सकाळी 6 ते सायंकाळी 8 या वेळात दर दोन तासांनी गुरव धर्म संस्कारांचे प्रात्यक्षीकासह ज्ञानदान करण्यात येणार आहे. सकाळची श्रींची विधीवत देवपुजा - श्रीं चा अभिषेक व मंत्रपठण, सत्यनारायण पुजापाठ व श्रींचे नामस्मरण आवाहन मंत्रपठण, विवाह विधी व सप्तपदी, दु:खद कार्य (स्मशानातील सर्व विधी - रक्षाविसर्जन - दशक्रीया - उत्तरकार्यविधी), पंचांग वाचन व अध्ययन अशा विविध विषयांवर वैदिक पौराणिक शास्त्रोक्त पध्दतीने प्रशिक्षण देणेत येणार आहे. या संस्कारशाळा धर्म प्रशिक्षण शिबीरासाठी नाव नोंदणी सुरू असुन दि. 05 मे 2023 पर्यंत नोंदणी प्रक्रीया सुरू राहणार आहे. सदर नाव नोंदणीसाठी 2500 रूपये नोंदणी शुल्क ठेवणेत आले आहे. *एकुण 7 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी 4500 रुपये सेवाकार्य शुल्क ठरविणेत आले आहे.*
दरम्यान याच प्रशिक्षण सत्राच्या समारोपानिमित्त सामुदायिक मौजीबंधन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. गुरव समाजातील ज्या पालकांना आपल्या मुलांचे मौजीबंधन करावयाचे आहे, त्यांनी देखील आपल्या मुलांची नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात येत आहे. *सामुदायिक मौजी बंधनसाठी पाच हजार रूपये एवढे सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे. सदरची संपुर्ण रक्कम नाव नोंदणी करताना भरावयाची असलेबाबतची माहिती राज्यनिमंत्रक दत्तात्रय पाटील यांनी दिली.*
🚩 *गुरव धर्म संस्कार शाळा - प्रवेश नोंदणीचे 2500 रूपये खाली दिलेल्या अकाऊंटवर आँनलाईन पध्दतीने भरावे....**दत्तात्रय हणमंत पाटील*खाते नं. 150518210016332बँक आँफ इंडीया (इस्लामपूर शाखा)IFSC CODE - BKID0001505*(2500 रूपये आँनलाईन भरल्याचा स्क्रीनशॉट व्हॉटसपवर पाठवावा. नोंदणी रक्कम भरल्याचा स्क्रीनशॉट असेल तरच नाव नोंदणी ग्राह्य धरण्यात येईल.)*🚩 *दत्तात्रय पाटील - मो. 9168187497*
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.