प्रियांका गांधी यांनी डोसा बनवला खरा पण झाले उलटच
कर्नाटका निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आहेत. प्रचारसभांनाही जोर आला आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस चुरशीची लढत आणि एकमेकांविरोधत सभा घेतानाही दिसत आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या सभेपूर्वी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. प्रियांका गांधी नेहमी प्रचारादरम्यान असं काही करत असतात ज्यामुळे त्यांची चर्चा होत असते. यावेळी त्यांनी डोस तयार केला आहे.
प्रियांका गांधी कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी काम करत असताना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी न्यू सयाजी राव रोड, अग्रहारा, म्हैसूरच्या जवळ असलेल्या मैलारी हॉटेलमध्ये डोसा तयार केला. त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन खास डोसा तयार करण्याचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या छोट्या मुलीसोबतही छान वेळ घालवला. म्हैसूरच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये त्यांनी नाश्तासाठी इडली आणि कुरकुरीत मसाला डोसा घेतला होता.त्यांच्यासोबत राज्य पक्षाचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, केपीसीसी प्रमुख डीके शिवकुमार आणि काही नेतेही यावेळी उपस्थित होते. हनूर येथील जोरदार प्रचारानंतर प्रियंका हॉटेल रेडिसन ब्लू प्लाझा इथे थांबल्या होत्या. त्यांच्या डोसा बनवताना आणि छोट्या मुलीसोबत गप्पा मारतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.