Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमित शाह दुसर्‍यांदा मुंबईत येणार; काय गुपित?

अमित शाह दुसर्‍यांदा मुंबईत येणार; काय गुपित?


महाराष्ट्रातील राजकारणाला वेग आलेला असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज, रविवारी पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत एका कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी ते येत आहेत. मात्र येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे राज्यातील दौरे वाढले असल्याचे बोलले जात आहे. तर एकाच महिन्यात शाह यांचा हा तिसरा महाराष्ट्र दौरा आहेत. शाह हे या पूर्वी खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी मुंबईत आले होते.
त्यानंतर ते नागपूर दौऱ्यावर येणार होते. मात्र तो रद्द झाला. त्यानंतर ते आता एका लग्नसोहळ्यासाठी आज मुंबईत येणार आहे. यावेळी ते भाजपच्या अनेक कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. तर दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त कार्यक्रमास देखील त्यांची उपस्थिती असेल. पण शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांमुळे अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.